Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण अनेक जुगाड करणाऱ्या व्यक्तींची व्हिडिओ पाहतो.सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. व्हायरल व्हिडिओतुन बऱ्याचदा व्यक्तींच्या अनेक जुगाडू कल्पना पाहण्यास मिळतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कपडे शिवण्यासाठी चक्क बाईकचा वापर केलेला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसून येते.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत एक मोटारसायकल दिसून येत आहे. ठिक मोटारसायकलच्या पाठीमागे एक शिलाई मशिन आहे. व्हिडिओच्या पुढे पाहिले तर दिसेल की दोन व्यक्ती आहेत. त्यामधील एक व्यक्ती शिलाई(sewing) मशिनवर एक कपडा शिलाई करण्यासाठी पकडून बसलेला आहे.

शिलाई करण्यासाठी शिलाई मशिनचे जे गोलाकार रिंग फिरवण्यासाठी आपण आपल्या हाताचा वापर करत असतो मात्र या व्हिडिओमध्ये एका व्यक्तींनी ती रिंग फिरवण्यासाठी चक्क मोटारसायकलच्या धावत्या चाकाचा वापर केला आहे. त्यासाठी त्यांनी मोटारसायकल सुरु करुन त्यांचे टायर फिरवून त्या वेगाच्या साहाय्याने कपड्यांची शिलाई केलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@Bollyocut_' या अकाउंटवर शेअर केलेला आहेय व्हिडिओ अठरा सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला असून तब्बल काही दिवसात व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे. मुळात व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने,'लोक काय करतील सांगता येत नाही' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,' काय राव काय कराव यांच' तर अनेकांनी यांच्या कल्पनेच कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT