Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: स्मार्ट काकू...! भांडी घासण्यासाठी केलेला हटके जुगाड पहा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Deshi Jugad Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेने केलेल्या जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेमके काय आहे हे पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात माराल.

Tanvi Pol

Woman Viral Video: सोशल मीडियावर नेटकऱ्यांना दररोज विविध व्हिडिओ पाहण्यास मिळतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंती येतात तर काही व्हिडिओ नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरतात,त्यातच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस एक व्हिडिओ आला आहे, मात्र तो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हसून डोक्याला हात मारत आहे. नक्की व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काय असेल ते प्रत्येकाने एकदा पहा.

सोशल मीडियावर व्हायरल(Viral) व्हिडिओत अनेकदा बऱ्याच प्रकारचे जुगाड केलेले व्हिडिओ पाहण्यास मिळतात. कधी हे जुगाड वाहनाच्या साहाय्याने शेतीची कामे केली जातात तर कधी काही जुगाड घरातील काम सोपे करण्यासाठी महिला वर्गाने केलेले असतात, त्यात सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,ज्यात एका महिलेने वॉशिंग मशीनमध्ये चक्क जेवणाची भांडी धुतली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला घरातील वॉशिंग मशीनजवळ जाते, त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये काही प्रमाणात पाणी भरल्यानंतर त्यात भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे वॉशिंग जेल टाकते, सुरुवातीला वाटते ती महिला कपडे धुण्यासाठी लावते मात्र जेव्हा ती वॉशिंग जेल टाकल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुधाण्यासाठी टाकण्याजागी चक्क जेवणाची भांडी टाकते, त्यानंतर वॉशिंग मशीन सुरु करते आणि ती भांडी धुतली जातात. हे सर्व पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होत असून डोक्याला हात लावत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''memesdekhtu' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंती आलेला आहे तर अनेक यूजर्संनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव आता'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कमाल'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT