Delhi Metro Women Fight Video Viral  Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video Viral : तुझ्या बापाची मेट्रो आहे का..? मेट्रो ट्रेनमध्ये महिलांचं भांडण, डायलॉग तर खतरनाकच!

Delhi Metro Women Fight Video Viral : सोशल मीडियावर ३० सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला कडाडून भांडताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Women Clash Video Viral

दिल्ली मेट्रो म्हणजे प्रेमवीरांचा अड्डा, बाचाबाची, वाद आणि मारामाऱ्यांचं ठिकाणच झालंय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या मेट्रो ट्रेनमध्ये घडलेल्या घटनांचे व्हिडिओ एकत्र केले तर, रोमँटिक, अॅक्शन पॅक्ड एखादा चित्रपटच होईल आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होईल, असं उपरोधिकपणे म्हणावं लागेल.

दिल्ली मेट्रोमधला आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात दोन महिला डब्यात उभं राहण्यावरून एकमेकींशी वाद घालताना दिसत आहेत. एका महिलेनं दुसरीला चक्क धक्का दिला. तर ही मेट्रो तुझ्या बापाची आहे का, असं बोलण्यापर्यंत एका महिलेची मजल गेली.

दिल्ली मेट्रोत तुमचं स्वागत आहे...तुम्हाला मनोरंजनाची गॅरंटी मिळेल, असं लोक चेष्टेने म्हणू लागलेत. या मेट्रोमध्ये लोक प्रवास करण्यासाठी नाही तर, भांडण, रोमान्स, डान्स आणि रील्स करण्यासाठीच येतात की काय, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर मेट्रोमधील असे अनेक व्हिडिओ बघायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर ३० सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला कडाडून भांडताना दिसत आहेत. एका महिलेने दुसरीला धक्का दिला. तर मागे हो नाही तर...असा धमकीवजा इशारा दुसऱ्या महिलेने दिला. तर दोघीही एकमेकींना तुझ्या बापाची मेट्रो आहे का, असं विचारताना या व्हिडिओत दिसत आहेत. या बाचाबाचीनंतर एक महिला शेवटी माघार घेत आणि भांडण मिटतं.

हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोत उभं राहण्यासाठी जागा न दिल्यानं दोन महिला भिडल्या, अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे. हा व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर कमेंटचा पाऊसच पडला आहे.

दिल्ली मेट्रोत तुमचं स्वागत आहे, अशी खिल्ली उडवणारी कमेंट एका युजरने केली आहे. कंटाळला असाल तर मेट्रोमध्ये जा, दिल्ली मेट्रोची काय अवस्था केलीय, या संपूर्ण घटनेवर तुम्ही काय बोलणार? अशा कमेंटही या व्हिडिओवर यूजरने केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT