Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे, लय वाईट! भांडण सोडवायला गेला; त्यालाच धु धु धुतला, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या दिल्लीमधील एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात दुसऱ्यांच्या वादात तिसऱ्याच व्यक्तीला मार बसलेला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कोणत्या महिलांचे वादविवाद तर कुठे पुरुषांची हाणामारी. या सर्व गोष्टी सोशल मीडियावर तात्काळ प्रसिद्ध होताता आणि कायम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यातही दोन पुरुषांच्या हाणामारीत तिसऱ्याच व्यक्तीला जोरदार मार बसलेला आहे. नक्की काय झाले असेल असा प्रश्न प्रत्येक नेटकऱ्याला पडलाचं असेल.

दिल्ली (Delhi) मेट्रोतील आजवर लहानातल्या लहान गोष्टी असो वा घटना (Event) व्हायरल झालेल्या आहेत. मात्र सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओही दिल्लीतील आहे. मात्र व्हायरल व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील नसून तो दिल्ली मेट्रो स्टेशनवरील तिकीट काउंटरवरवरील आहे. जिथे एका व्यक्तीला विनाकारण मार खावा लागला आहे.

काय घडले नक्की?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमधून व्हिडिओमधील हाणामारीचे कारण आपल्याला समजते. जे तिकीट काउंटरवरील पैशांच्या कारणावरुन झालेले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,' तुम्हाला दिल्ली शहरातील एक मेट्रोचे तिकीट काउंटरवर दिसून येत आहे, मात्र यावेळी दोन व्यक्ती तिकीट काउंटरच्या तिथे उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये वादविवाद होण्यास सुरुवात होते.

त्यांचे वाद वाढल्यानंतर ते हाणामारी करण्यास सुरुवात करतात मात्र तिथे असलेल्या प्रवाशांमधून एक व्यक्ती त्यांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यातील एक व्यक्ती वाद सोडवणाऱ्याच व्यक्तीला मारतो. संपूर्ण घटना तिकीट काउंटरजवळ असलेल्या व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. मात्र तो एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत''दिल्ली मेट्रोमध्ये नाणी खरेदी करताना दोन काकांमध्ये हाणामारी'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ आतापर्यंत एक कोटी नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय झाले नक्की समजल नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' दुसऱ्या व्यक्तीला का मारले भावा'' एवढचे नाही तर अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

SCROLL FOR NEXT