Delhi Metro Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro: 'माझ्या डोक्यावर बसशील का...?' दिल्ली मेट्रोत प्रवाशांमध्ये सीटवरून कडाक्याचं भांडण, Video व्हायरल

Latest Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये सतत काही ना काही घडत असते. आता पुन्हा दिल्ली मेट्रोतील भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Delhi Metro Viral Video News

देशाची राजधानी दिल्ली मेट्रोमध्ये नेहमीच काही ना काही घडत असतं. मेट्रोतील भांडणाचे व्हिडिओ (Delhi Metro Video) सतत व्हायरल होत असतात. कधी कधी मेट्रोमध्ये एखादं कपल रोमान्स करताना दिसतं. तर कधी कधी भांडताना दिसतं. कोण सायकवरून मेट्रोतून प्रवास करतं, तर कोण मेट्रोमध्ये डान्स करतं. अशा वेगवेगळ्या कारणांमुळं मेट्रो नेहमीच चर्चेत असते. (Latest Marathi News)

आता असाच एक मेट्रोतील (Delhi Metro) व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका जागेवरून दोन लोकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रोमध्ये लोकांची गर्दी खूप आहे. व्हिडिओमध्ये सीटवर बसलेला एक वृद्ध व्यक्ती चिडून दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो, 'तू माझ्या डोक्यावर बसशील का?' यानंतर दोघांमध्ये वाद सुरू (Delhi Metro Fight Video) होतो. 'तू मूर्ख आहेस का...?' असं रागाच्या भरात ती व्यक्ती म्हणते, ॉयावर दुसरी व्यक्ती होय म्हणते. शेजारी बसलेले लोकं दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर घर के कलेश नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला ( Fight Video Viral) आहे. या व्हिडिओवर लोकं सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये आजकाल हाणामारी ही गोष्ट सामान्य झाली आहे. कोणी सीटसाठी भांडत आहे तर कोणी रील बनवून नाचत आहे. याआधीही दिल्ली मेट्रोमध्ये अनेक वेळा भांडणं झाले आहेत. यातील बहुतांश भांडणं केवळ जागेसाठी झाले (Viral News) आहेत. मेट्रोमध्ये रील्स बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT