Accident Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Accident Video: घराच्या बाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला कारनं चिरडलं; जागीच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Accident Video Car Hit Woman :

दिल्लीच्या गीता कॉलनीमध्ये संतापजनक घटना घडलीय. घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला एका कारने चिरडल्याची घटना घडलीय. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओ एक महिला सकाळीच्या वेळी घराबाहेरील जागेत झाडू मारत होती. त्याचवेळी त्या गल्लीमध्ये एक कार आली. गल्लीमध्ये शिरताच काराचा स्पीड वाढला आणि ती कार अनियंत्रित झाली. (Latest News)

त्यावेळी कारने झाडू मारणाऱ्या महिलेला उडवलं. महिलेला कार धडकताच महिला पुढे फेकल्या गेली आणि कार आणि भिंतीच्या मध्ये अडकली. या दुर्घटनेत महिला जबर जखमी झाली होती आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्यानंतर कारमधून एक मुलगी बाहेर येते आणि महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. कार आणि घराच्या उंबरठ्यामध्ये अडकली होती. त्यानंतर ती कार चालकाला कार मागे घेण्यास सांगते.

परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला आणि त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. गीता कॉलनी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं वय ५५ वर्ष होतं. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून दिल्लीत बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाणे वाढलं आहे. याआधी पूर्व दिल्लीतील गाझीपूरमधील मर्करी बाजारमध्ये अपघाताची घटना समोर आली होती. येथे एका भरधाव कारने १५ जणांना चिरडले होते. यातही एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेत चालक दारूच्या नशेत होता. अपघातानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

भरधाव कारची धडक... तरुण चेंडूसारखे हवेत उडाले

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये भरधाव कारने तीन युवकांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर चौकाजवळ एका भरधाव कार चालकाने तिघांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा, त्या अधिकाऱ्याला इथूनच आऊट करतो; मनोज जरांगे कुणावर भडकले?

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

PM Mudra Yojana : तरुणांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज; असा मिळवता येईल लाभ

SCROLL FOR NEXT