Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भरधाव ट्रकचा कहर! चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक; सीसीटीव्हीत थरार कैद

Shocking Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका भयानक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या अपघात कसा घडला ते समजण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Dhule Shocking News: भरधाव चालवणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅकने दुचाकीला जबर धडक दिली.या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे तर महिला आणि युवक बचावले आहेत.संजय पवार असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील मुंबई(Mumbai) आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आमोदे येथील शिरपूरकडून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शिरपूर फाट्यावर उड्डाण पुलाखालून सरळ दुकानात शिरला होता.

याच वेळी जे रस्त्यात येईल त्याला अनियंत्रित ट्रकने चिरडले, त्यात संजय पवार हा दुचाकी वरून जात असतांना त्याला या अनियंत्रित झालेल्या ट्रकने धडक देत पुढे असणाऱ्या महिलेला देखील धडक दिली आणि पुढे हा ट्रक थेट दुकानात शिरला.

या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला असुन दुचाकी(Bike) धारक संजय पवार यांचे दोन्ही पाय या अपघातात निकामी झाले आहेत, सुदैवाने महिला फेकली गेल्याने व रस्त्यावर समान विक्री कारणारा युवक देखिल यात बालंबाल बचावले असुन या अपघाता बबत पुढील कारवाई थाळनेर पोलीस करीत आहेत.

टीप: हा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT