Viral Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोल्हापुरात पाण्याने तुडुंब भरलेल्या नदीत तरुणांची स्टंटबाजी; दीपमाळेवरून पंचगंगेत उड्या, व्हिडिओ व्हायरल

Viral Video kolhapur : सध्या सोशल मीडियावर अनेक तरुणांचे धोकादायक स्टंट करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात काही तरुण नदीत उड्या मारताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. यासोबत अनेक दिवसांपासून फिरायला गेलेल्या ठिकाणी तरुणांचे स्टंटबाजी करतानाचे खूप व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत मात्र यात अनेकांचा दुर्देवी मृत्यूही झालेले आहेत. त्यात सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्या व्हिडिओत कोल्हापुरच्या पंचगंगा नदीत काही तरुण धोकादायक पद्धतीने उड्या मारत स्टंट करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या तरुणपिढी सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करताना दिसून येतात. दिवसेंदिवस या गोष्टींची तरुणांमध्ये क्रेझच होत चालली आहे. तरुणपिढी (young generation)चर्चेत राहण्यासाठी काहीतरी हटके, मजेशीर आणि त्यात धोकादायक व्हिडिओ बनवतात. नुकताच काही तरुणांचा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये पंचगंगा नदीच्या कडेला असलेल्या दीपमाळवरुन नदीत उड्या मारत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कोल्हापुरमधील (kolhapur)आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. त्यात पंचगंगा नदीतही दुथडी भरुन वाहु लागली आहे. त्यातच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही तरुणांचे धोकादायक स्टंट तुम्ही पाहू शकता. पंचगंगा नदीच्या बाजूला असलेला काठही संपूर्ण पुराच्या पाण्याने भरुन गेलेला आहे. त्यात नदीच्या काठी असलेल्या दीपमाळवरुन एकापाठोपाठ एक तरुण नदीत उड्या मारत आहे.

व्हिडिओ (Video)व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत शिवाय तरुणांवर कारवाई करावी असे प्रत्येक नेटकरी वर्गाला वाटत असेल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात धबधब्यावर गेलेल्या काही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अशा घटना ताज्या असताना हे तरुण धोकादायक स्टंट करताना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT