Viral News : हायवेवर रील बनवण्यासाठी डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? meta ai
व्हायरल न्यूज

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

Traffic Rules : सोशल मीडियावर Viral होण्यासाठी महामार्गावर वाहने थांबवणे, Bonnet किंवा छतावर चढणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आता महागात पडू शकते. या स्टंटबाजीवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे जर नियम मोडलेत तर कायद्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Saam Tv

प्रत्यक्षात रस्त्यावर वाहने अचानक थांबली आहेत... एक रिलस्टार वाहनाच्या बोनेटवर चढला आहे... अॅक्शन म्यूझिक, भरपूर ड्रामा ... आणि व्हिडिओ गेला मिलियन पार... पण आता हाच मिलियन पार नेणारा आणि लाखो फॉलोवर्स मिळवून देणारा व्हिडिओ थेट जेलची हवा खायला लावू शकतो.

सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडावा, अनेक फॉलोवर्स वाढावे, यासाठी अनेक ट्रेंड्स फॉलो केले जातात. याशिवाय भर रस्त्यात वाहनांना थांबवणे, वाहनाच्या बोनेटवर चढणे, रील शूट करत भर रस्त्यात वाकडी तिकडी वाहने चालवणे. इ. खतरनाक स्टंटही केले जातात. याच स्टंटवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. राजमार्ग किंवा महामार्गाच्या ठिकाणी वाहनांना थांबवून स्टंटबाजी केल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे. या बाबतीत रस्ते महामार्गाने नवी नियमावली जाहीर केली आहे.

  • कोणत्याही वाहनाला धोकादायक थांबवणे , स्टंट किंवा रिल शूट करताना वाहनाच्या बाहेर डोकावल्यास अधिनियमन धारा १८४ च्या अंतर्गत पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्यांना १००० ते ५००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

  • कोणत्याही घटनेशिवाय जाणूनबूजून कोणत्याही वाहनाला थांबवणे किंवा शूट करण्यासाठी रस्त्यावर कब्जा करणे,दुसऱ्या वाहनांना येण्या - जाण्यास अडथळा निर्माण करणे यावरही कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

  • व्हिडिओ शूट करताना बोनेट किंवा वाहनाच्या टपावर चढताना अपघाताची शक्यता असते. अश्यावेळी इतर प्रवाशांचे वाहनावरील नियंत्रण सुटू शकते. यामुळे भयंकर अपघात घडण्याची शक्यता असते.

  • स्टंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनावर देखील कारवाई केली जाणार आहे. याशिवाय ड्राईव्हरचे लायसन्स देखील जप्त केले जाऊ शकते. भरमसाठा दंड देखील आकारला जाण्याची शक्यता आहे.

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असे धोकादायक रिल शूट करत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्यावर दंड किंवा बेड्या ठोकल्या जाऊ शकतात.

  • असी स्टंटबाजी करून व्हायरल केलेले व्हिडिओ पोलिसांना सहज सापडू शकतात . ते ठिकाण, आजूबाजूचा परिसर आणि तिथे असलेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT