Mumbai Local Train Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक शेर तर दुसरी सव्वाशेर, मुंबई लोकलमध्ये तरुणींचा धमाकेदार डान्स; पाहा VIDEO

Mumbai Local Train: सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पुन्हा एकदा तरुणींचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मात्र या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Local Viral Video News : मुंबई राणी अर्थात मुंबई लोकल ट्रेन. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. लोकलमधून प्रवास करताना प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला अनेक अनुभव मिळतात. कुठे प्रवाशांमध्ये छोट्या कारणावरुन हाणामारी? तर कुठे चक्क पुरुषांच्या कंपार्टमेंटमध्ये भजनाचा माहोल. सध्या सोशल मीडियावर असाच एक मुंबई लोकलमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात महिला कंपार्टमेंटमध्ये दोन तरुणींचा भन्नाट डान्स व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ मुंबई लोकलमधील(Mumbai local) असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबई लोकलमधील सुद्धा लेडीज कंपार्टमेंटमधील व्हिडिओ आहे. या व्हिडिओ दोन तरुणी दिसून येत आहे. दोघींनीही लॉंग कुर्ता परिधान केलेला आहे. यानंतर व्हिडिओ (Video) तुम्हाला दिसेल की, दोघींही एका गाण्याच्या धुनवर डान्स करत आहे. यांच्यापाठी मागे पुरुष कंपार्टमेंट दिसून येत आहे. यातील सर्व पुरुष तरुणींचा डान्स (Dance)पाहताना दिसत आहे. तरुणींचा डान्स हा लेडीज कंपार्टमेंटमधून एका सहप्रवाशाने किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी कैद केलेला आहे.

तरुणींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर दोन दिवसांआधी शेअर करण्यात आलेला आहे. मात्र हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@_pluviophilic_and archu_gavali844'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'' आमचे काही सदस्य आज नाही मात्र लवकरच तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसून येतील शिवाय या व्हिडिओलाही तुम्ही खूप प्रेम द्या''.

नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया, पाहा कोण काय म्हणाले ?

मुंबई लोकलमधील या तरुणींचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल होताच जवळपास १० हजार नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही कमेट्सबॉक्समध्ये केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नवरात्री येत आहे एखादे छान से नृत्य होऊ दे आई माऊलीसाठी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूप छान'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' छान डान्स'' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT