Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: "नवरीला विसरून, मांडवात नवरदेवाचा संबळच्या ठेक्यावर डान्स"; VIDEO जोरदार व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका नवरदेवाचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने नवरीला विसरुन धमाकेदार हलगीवर ठेका धरला आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर अनेकदा लग्नाच्या कार्यक्रमातील प्रत्येकाचे डान्स पाहण्यासाठी मिळतात. कधी नवर देवाच्या बहिणीचा डान्स असतो तर कधी नवरी मुलीच्या घरातल्यांचा डान्स असतो, मात्र त्यातच सध्या अशाच एका डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात चक्क नवरदेवाचा डान्स व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ कुठे पाहता येईल?

नवरदेवाचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो ''abhijeetjadhav_07'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. इन्स्टावरील या व्हिडिओला ५ दिवसात २४ हजार नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''दिमडी संबळाच्या नादाने सगळं मार्केट गाजवलं पाहिजे'',असे लिहिण्यात आलेले असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे आणि नवरदेवाचे नाव समजू शकलेले नाही मात्र या व्हिडिओला प्रत्येक माध्यमातून मोठी पसंती मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मंगल कार्यलयातील एक मोकळे मैदान दिसत आहे. व्हिडिओत दिसत असलेल्या या मैदानात नवरदेव आणि त्या घरातील अनेक मंडळी दिसत आहे, ज्यात काही तरुणी अन् काही तरुण आहेत. मात्र या लग्नातील स्टेजवर एक व्यक्ती संबळ वाजवत आहे. संबळचा ताल इतका भारी होता की नवरदेव आणि त्याच्या सोबत असलेले सर्वजण तिथेच डान्स करण्यास सुरुवात करतात. नवरदेवाचा डान्स पाहून तुम्ही आणि तिथे असलेला प्रत्येकजण आनंदी होत आहे.

टीप : नवरदेवाचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

Pan Card: नावाची स्पेलिंग चुकली? तर तुमचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून होईल बंद, घरबसल्या ५ मिनिटांत करा हे काम

Maharashtra Live News Update: पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे भागात अवकाळी पाऊस

Crime news: हॉस्टेलमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर गँगरेप, रुम दाखवण्याच्या बहाण्याने ५ तास अत्याचार

What is CKYC: आता सारखं सारखं KYC ची गरज नाही, फक्त एकदाच करा CKYC; वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT