Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: PM मोदींच्या स्वागतासाठी दादा भुसेंचं तीन पावले नृत्य; पाहा व्हिडिओ

Narendra Modi Nishak Tour: पंतप्रधान मोदींनी यावेळी श्री काळाराम मंदिराचंही दर्शन घेतलं. येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 जानेवारी) सकाळी महाराष्ट्रात दाखल झाले. यावेळी पहिल्यांदाच मोदींनी नाशिकमध्ये रोड शो केला. त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून ढोल ताशांसह आतिषबाजी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी देखील रोड शो पाहण्यासाठी गर्दी केली होती. अशात मोदींच्या स्वागतातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी श्री काळाराम मंदिराचंही दर्शन घेतलं. येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. यावेळी दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर केलं.

डफलीच्या तालावर भुसेंनी चांगलाच ठेका धरला होता. दादा भुसे यांच्या तीन पावली नृत्याचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आज नाशिक रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही दिसले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब पुल अटल सेतूचे उद्घाटन देखील केले. तसेच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी श्री काळाराम मंदिरात पोहोचून पूजा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT