Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाप रे! बेलापूर पोलिस स्टेशनमध्ये शिरला भलामोठा अजगर; मग पुढे काय झाले पाहाच..

Snake Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक सापांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात साप कुठे आढळून आलेला आहे तो तुम्ही पाहाच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोलिस स्टेशन, हॉस्पिटल आणि कोर्टाची पायरी कधीच चढू नये असे अनेकजण म्हणतात. सामान्य माणसाला पोलिस स्टेशनचे नाव काढताच टेंशन येते. मात्र एका अशाच पोलिस स्टेशनमध्ये शिरण्याचे धाडस एकाने केले आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनमधील कर्मचारीच नाही तर पोलिस स्टेशनच्या परिसरातील सर्व नागरिक त्याला घाबरले आहेत. तो म्हणजे भला मोठा अजगर. सध्या सोशल मीडियावर पोलिस स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्या पोलिस स्टेशनमध्येच भला मोठा अजगर आढळून आलेला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सापाने नाव काढताच भल्याभल्या व्यक्तींच्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर याआधी अनेक साप किंवा भला मोठा अजगर आढळून आल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. या व्हायरल व्हिडिओत साप कधी बेडरुमच्या बेडवर तर कधी स्वयंपाक घरात आढळून आलेला आहे. मात्र सध्या भल्या मोठ्या अजगराने थेट पोलिस (Police) स्टेशनमध्ये वर्दी दिलेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ (Video) बेलापूरमधीलो पोलिस स्टेशन दिसून येत आहे. ज्या पोलिस स्टेशनमध्ये एका खोलीत एक टेबल आहे. याच टेबलच्या खाली तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला वेटोळे मारुन बसलेला एक भला मोठा अजगर (Python) दिसून येईल. मात्र काही वेळात पोलिस स्टेशनमध्ये सर्प मित्र येऊन त्या अजगराला सुरक्षितीरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

SCROLL FOR NEXT