Crab Attack On Girl Saam TV
व्हायरल न्यूज

Crab Attack On Girl: नाद करा पण खेकड्याचा कुठं; नांग्यानी थेट पोरीचे केसच धरले, पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

Crab Viral Video: खेकड्याने आपल्या नाग्यांनी एकदा का कुणाला पकडलं तर सोडता सोडत नाही.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: पावसाळा सुरू होताच रानात रानभाज्या येतात. अनेक व्यक्ती या भाज्या आवडीने खातात. पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यामुळे अनेक व्यक्ती पावसाळ्यात येणाऱ्या खेकड्यांवर ताव मारतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका खेकड्याच्या मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

खेकडा खायला जितका चमचमीत लागतो तितकाच तो पकडणे कठीण असते. खेकड्याने आपल्या नाग्यांनी एकदा का कुणाला पकडलं तर सोडता सोडत नाही. खेकड्याचे नांगे इतके मजबूत असतात की ते एखाद्याला रक्तबंबाळ देखील करू शकतात.

अशात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी आपल्या घरी खेकडे आणल्याने खूप खुश होते. खेकडे खाण्यासाठी ती त्यांच्या जवळ जाते. अशात खेकड्याजवळ जाताच तो या मुलीचे केस पकडतो. केस पकडल्याने ती फार घाबरते. आता आपली सुटका नाही असं समजून ही मुलगी रडू लागते.

कुटुंबातील अन्य काही व्यक्ती या मुलीला खेकड्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र खेकडा इतका जिद्दी की तो तिचे केस सोडता सोडत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी देखील यावर हसण्याचे इमोजी पाठवत आहेत. व्हिडिओ पोस्ट करत डोक्यावर बसली चिंबोरी असं यावर लिहिण्यात आलं आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी खेकडे खाताना आणि पकडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT