Cow Attack Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: खोड काढली, अद्दल घडली! गाईने तरुणाला थेट हवेत उडवले... थरारक VIDEO

Cow Attack Viral Video: अनेकदा भटक्या गाई किंवा बैलांचे मुद्दाम खोड काढल्यामुळेही ते हल्ला चढवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकदा भटक्या गाई किंवा बैलांचे मुद्दाम खोड काढल्यामुळेही ते हल्ला चढवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शांत बसलेल्या गाईंची खोड काढणे एका मुलाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

शांत बसलेल्या गाईला डिवचल्यानंतर तरुणावर थेट हल्ला चढवल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून तरुणालाच खडेबोल सुनावले आहेत. तसेच त्याच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व गाई एका रांगेत बसल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी तीन तरुण व्हिडिओ काढण्यासाठी जातात. त्यामधील दोन तरुण पुढे गाईंना डिवचत असल्याचे दिसत आहे तर एक तरुण त्यांचा व्हिडिओ शूट करत आहे. अशातच एका तरुणाने गाईची खोड काढल्यानंतर ती गाय वैतागून या तरुणाला लाथ मारुन थेट हवेत उडवते.

gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तो हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी तरुणांच्या कृतीवर संताप व्यक्त करताना मुक्या प्राण्यांना त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

SCROLL FOR NEXT