Couple romance in flight  Saam tv
व्हायरल न्यूज

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

Couple romance in flight : उडत्या विमानात कपलचा रोमान्स केल्याची घटना घडली आहे. जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

प्रेम करणे चुकीचं नाही. पण जागा आणि आजूबाजूला असलेल्या मंडळीचा विचार करायला हवा. प्रेमात आंधळे झालेले जोडपे अनेकदा भान विसरून कृत्य करत असल्याचे दिसतात. भान विसरलेल्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिक्षा, ट्रेन असो बसमध्येही जोडप्याचे अश्लील चाळे पाहायला मिळतात. आता एका जोडप्याने हद्दच केली. या जोडप्याने उडत्या विमानात रोमान्स केला. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध टिकटॉकर हॅरी मर्जारम हा गर्लफ्रेंडसोबत ग्रीसला निघाला होता. हॅरी मर्जारमचा हा विमान प्रवास ४ तासांचा होता. हॅरीनेच जोडप्याचा कृती चव्हाट्यावर मांडली आहे. हॅरीनेच एका व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओतून जोडप्याचं बेशिस्त कृत्य सोशल मीडियातून चाहत्यांसमोर मांडलं.

हॅरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमानात जोडपं खुल्लम-खुल्ला रोमान्स करताना दिसत आहे. तरुणीने बॉयफ्रेंडच्या मांडीवर डोके ठेवंल्याचं दिसत आहे. या तरुणीचे पाय हॅरीच्या गर्लफ्रेंडच्या सीटला लागत होते.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. १ कोटींहून अधिक लोकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे. या व्हिडिओवर हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी जोडप्याची बाजू घेत आहे. तर काही जण जोडप्यावर टीका करत आहे.

एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'मला कळत नाही की, लोक या जोडप्यावर टीका का करत आहे? मला तर हे जोडपं खूप भारी वाटत आहे. दुसऱ्याने म्हटलं की, 'प्रेम व्यक्त करणे गुन्हा नाही. पण हात पकडून एकमेकांच्या अगदी जवळ बसणे योग्य नाही'. 'प्रत्येकी गोष्टीची मर्यादा असते. त्या मर्यादांचं उल्लंघन करायला नको. मात्र, या जोडप्याने मर्यादा सोडली आहे, असेही एका युजरने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT