Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : प्रेमात आंधळे! लोकल ट्रेनच्या छतावर कपलचा रोमान्स; व्हिडिओ जोरदार व्हायरल

Couple Walk On Roof Of Train : व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आणि तरुणी एकत्र रेल्वे ट्रेनच्या टपावर चढले आहेत. एखाद्या बागेत हातात हात घेऊन फिरावं तसं हे दोघे फिरत आहेत. ट्रेनमध्ये असे अनेक प्रेमीयुगुल पाहायला मिळतात.

Ruchika Jadhav

Viral Video :

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतात. प्रेमीयुगुल सोशल मीडियावर कायम ॲक्टीव असतात. सध्या जोडप्यांच्या अतरंगीपणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यातील एक व्हिडिओ तर असा आहे जो पाहून तुम्हाला एक तर भरपूर राग येईल संताप होईल किंवा तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आणि तरुणी एकत्र रेल्वे ट्रेनच्या छतावर चढले आहेत. एखाद्या बागेत हातात घालून फिरावं तसं हे दोघे फिरत आहेत. ट्रेनमध्ये असे अनेक प्रेमीयुगुल पाहायला मिळतात. मात्र या दोघांनी हद्दच पार केली. कारण ट्रेनमध्ये सीटवर बसून किंवा रेल्वे स्टेशनला नाही तर थेट ट्रेनच्या छतावर या दोघांचा रोमान्स सुरू आहे.

एकमेकांच्या हातात हात घालून दोघेही ट्रेनवर फिरत आहेत. काही वेळाने ते याच ट्रेनच्या छतावर बसतात. समोरच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या एक व्यक्तीने या दोघांना आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत यावर 100 टक्के प्रेमात आंधळे झालेल्या व्यक्ती असं कॅप्शन यावर लिहिण्यात आलं आहे.

नेटक्याऱ्यांनी देखील यावर अनेक मजेशीर कमेंट केल्यात. प्रेमात घायाळ, आंधळं प्रेम म्हणतात ते हेच का, या दोघांना देखील वेड्याचे झटके आलेत, अशा कमेंट यावर आल्यात. तर काहींनी या दोघांनी केलेल्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. ही ट्रेन जर धावत असती तर दोघेही वाचले नसते, खाली उडून पडले असते असं काहींनी म्हटलं आहे.

आता हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेल नाही. मात्र व्हिडिओ पाहिल्यावर येथील रेल्वे प्रशासन आरपीएफ अधिकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन योग्य तो कारवाई केली असेल अशी शक्यता आहे.

प्रेमीयुगुल अनेकवेळा आपण काय करतोय कुठे आहोत याचं भान विसरून जातात. त्यात अशी स्टंटबाजी करणाऱ्या कपलमुळे इतर नागरिक किंवा प्रवाशांना त्रास होतो. सदर प्रेमीयुगुल ट्रेनच्या छतावर बसल्याने त्यांना खाली उतरवून रेस्क्यु करेपर्यंत बराच उशीर झाला असणार. परिणामी ट्रेन लेट होऊन अन्य प्रवाशांना त्रास झाला असणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT