cockroach in coffee saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Cockroach Powder in Coffee: तुम्ही कॉफी पिता का...? तुम्ही पित असलेल्या कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते...हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल.मात्र होय, कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते असा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय.पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा धक्कादायक दावा ऐकून तुम्ही कॉफी पिणंच सोडून द्याल.कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय.इतकंच नव्हे तर भारतात 20 टक्केही झुरळाची पावडर टाकली जाते असा खळबळजनक दावा केलाय.हा दावा गंभीर आहे.

झुरळ दिसलं तरी काही लोक पळतात.तर काही जण झुरळाला मारून टाकतात.आणि झुरळाची पावडर कॉफीत टाकली जाते असा दावा केल्याने कॉफी पिणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.खरंच कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते का...? या दाव्यात तथ्य असू शकतं का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.कारण, देशभरात बरेच लोक कॉफी आवडीने पितात.त्यामुळे याची सत्यता समोर आणणं महत्त्वाचं आहे.आमच्या व्हायरल सत्य टीमने याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घेतला.

इन्स्टंट कॉफीमध्ये लहान अवशेष जास्त दिसू शकतात, कारण निर्मिती प्रक्रियेत हे अवशेष बारीक होऊन मिसळण्याची शक्यता असते...कोणतेही खाण्याचे प्रोडक्ट बाजारात येतं त्यावेळी FDA ची मान्यता घ्यावी लागते...त्यानंतरच पुढे हे प्रोडक्ट विक्रीला येतं.त्यामुळे कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT