Kobra Snake Hiding Behind Fridge Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Snake Video: किचनमध्ये काम करताना जरा जपून! फ्रीजमागे लपला होता भलामोठा कोब्रा; VIDEO पाहून थरकाप उडेल

Kobra Snake Hiding Behind Fridge Video: घरातील फ्रीजच्या मागे भलामोठा साप लपला आहे. साप पकडण्यासाठी आलेला सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सोशल मीडियावर (social media) आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आपल्या अंगावर काटा उभा राहतो. या व्हिडिओंमध्ये असे काही प्रकार पाहायला मिळतात जे पाहून विश्वास ठेवणं कठीण होवून जातं. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.

साप म्हणलं की भल्या भल्यांची तारांबळ उडते. सापाशी पंगा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच आहे. समोर साप पाहताच न घाबरणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. अनेकदा घरात, किचनमध्ये किंवा पार्क केलेल्या गाड्यांमध्येही साप आढळल्याचे प्रकार समोर येत असतात.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक धक्कादायक व्हि़डिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क घरातील फ्रीजच्या मागे भलामोठा कोब्रा आढळल्याचे दिसत आहे. फ्रीज ही घरातील सर्वात उपयोगी वस्तू.. अशातच चक्क फ्रीजमागेच साप आढळल्याने अनेकांनी फ्रीज वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, घरातील फ्रीजच्या मागे भलामोठा साप लपला आहे. साप पकडण्यासाठी आलेला सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साप त्याच्याच अंगावर झेप घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर शेवटी तो सर्पमित्र त्या सापाला पकडून पिशवीत बंद करताना दिसत आहे.

सर्पमित्र आकाश जाधव या अकांउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी घरातील फ्रीज वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच काही जणांनी त्या सर्पमित्राच्या धाडसाचे कौतुकही केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT