Snake In Shirt Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake In Shirt Viral Video: तो शेतात बसला होता; अचानक शर्टात साप घुसला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

पावसाळ्यात अथवा अन्य दिवसांत शेतात साप, वाघ, बिबट्या असे प्राणी आढळतात.

साम टिव्ही ब्युरो

Cobra Snake Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. शेतात काम करताना शेतकऱ्यांना प्राण्यांपासून स्वत:ची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अथवा अन्य दिवसांत शेतात साप, वाघ, बिबट्या असे प्राणी आढळतात. अशात आता सोशल मीडियावर सापाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Snake Viral News)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या शेतात काम करत होता. यावेळी अचानक एक साप त्याच्या जवळ आला. हा व्यक्ती कामात इतका मग्न होता की आपल्याजवळ साप असल्याचं त्याला कळलं सुद्धा नाही.

नंतर हा साप थेट त्या व्यक्तीच्या शर्टात घुसतो. साप शर्टात आल्यावर त्याच्या स्पर्शाने या व्यक्तीला लगेचच कळतं. त्यामुळे तो पुर्णता भयभीत होतो. अन्य व्यक्ती देखील त्याच्या शेजारी घोळका करतात. सर्वजण या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

माणसांनी घोळका करताच साप देखील घारलेला दिसतोय. साप या व्यक्तीच्या शर्टातून टोकावतो आणि पुन्हा आतमध्ये जातो. सापाने तोंड शर्टामध्ये टाकल्यावर व्यक्ती थरथर कापू लागतो. त्यानंतर सर्वजण त्याला धीर देतात. त्याला शांत राहण्यस सांगतात. त्यावर व्यक्ती शांत बसतो. काही वेळाने साप स्वत: शर्टातून खालच्या दिशेने खाली निधून जातो.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. साप शर्टात जाईपर्यंत झोप काढत होतास का? असा प्रश्न एका व्यक्तीने कमेंटमध्ये विचारलाय. तर अनेकांनी यावर भीती व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT