Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणीची छेड काढली, जमावाने रोडरोमिओला धू धू धुतले; व्हिडीओ व्हायरल

Viral News: छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर आली होती.मात्र त्यानंतर त्या तरुणाला चांगलाच चोप देण्यात आलेला आहे.

Tanvi Pol

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.ज्यात खासगी अभ्यासिकेत एका तरुणाकडून तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर समोर आला होता, मात्र युवासेनेने तरुणाला चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर आली होती.मुलींना अर्वाच्च भाषेत शिवागीळ करत मारहाण (Beating) केल्याची माहिती युवासेना शहरयुवाधिकारी सागर खरगे यांना फोनद्वारे मिळाली त्यानंतर युवासैनिकांनी अभ्यासिकेला भेट देत शहानिशा करताच युवकाने धूम ठोकली.

यानंतर संचालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवी उत्तरे दिली. त्याच्याजवळ विद्यार्थ्याची कुठलीही माहिती आणि नंबर नव्हता.त्यानंतर संचालकास युवासैनिकांनी दम देताच त्याने मुलाची ओळख पटवत त्याला घटनास्थळी बोलवले. युवासैनिकांनी त्या तरुणास चोप दिल्यानंतर मुलीची त्याने माफी मागितली. यावेळी शहरयुवाधिकारी सागर खरगे, उपशहरयुवाधिकारी आकाश जैन, विभाग युवाधिकारी शुभम उरफाटे, प्रसाद बाविस्कर,रोशन ढाकरे,महावीर सुराणा,अजमत अब्बास अली यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून असे प्रकार नेटकऱ्यांच्या समोर येत आहे.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ युट्युब चॅनेवरली Saam TV या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT