Viral VIdeo Saamtv
व्हायरल न्यूज

Washing Machine Viral Video: खेळता खेळता चिमुकला वॉशिंग मशीनमध्ये गेला अन स्विच ऑन झाला; पुढं जे घडलं ते...

Child In Washing Machine Viral Video: व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त करत लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान केले आहे.

Gangappa Pujari

Child Entered Washing Mashine Viral Video: घरात पालकांचा डोळा चुकवून लहान मुले असे काही पराक्रम करतात, ज्यामुळे अनेकदा डोक्याला हात लावण्याची वेळ येते. आई बाबा कामात असताना प्रत्येकवेळी लहान मुलांकडे लक्ष ठेवणे शक्य नसते. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडल्याचेही पाहायला मिळते.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका घरातील चिमुकले खेळत खेळत वॉशिंग मशिनमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही...

सोशल मीडियावर (Social Media) नेहमी विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी अंगावर काटाही उभा राहतो. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामधील चिमुकल्यासोबत जे झालं ते पाहून तुम्हीही घाबरुन जाल.

घरात कोणी नसताना एक चिमुकला वॉशिंग मशीनमध्ये अडकल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त करत लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान केले आहे. (Latest Marathi News)

व्हायरल होत असलेल्या (Viral Video) व्हिडिओमध्ये घरामध्ये दोन लहान मुले खेळत असल्याचे दिसत आहे. खेळता खेळता एक मुलगा समोरच असलेल्या वॉशिंग मशीनमध्ये जावून बसतो. तर दुसरा मुलगा वॉशिंग मशीनचे स्विच ऑन करतो. स्विच ऑन झाल्याने तात्काळ मशिनचा स्पिन फिरायला लागतो.

लहान मुलगा बसलेला असतानाच हा स्पिन गरगर फिरायला लागतो. व्हिडिओमधील लहान मुलगा या प्रकाराने हसताना दिसत आहे. मात्र अशा दुर्लक्षामुळे एखादा अनर्थही होवू शकतो.. असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अशी घ्या मुलांची काळजी...

  • दरम्यान, लहान मुले घरात खेळत असताना अनेकदा पालकांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे दुर्घटनाही घडतात. त्यामुळेच घरातील चिमुकल्यांवर लक्ष ठेवावे.

  • घरातील विजेच्या वस्तू, इलेक्ट्रिक साधने, टीव्ही, मोबाईल मुलांपासून लांब ठेवावेत.

  • घरात स्वयंपाक करताना किंवा इलेक्ट्रिक साधने हाताळताना लहान मुलांना जवळ येवू देवू नये.

  • लहान मुलांना वारंवार गेम खेळण्यासाठी मोबाईल देणे ही धोकादायक आहे. त्यामुळे त्याचीही सवय मुलांना लावू नये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT