Ms Dhoni portrait On WaterMelon Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भारीच! कलिंगडावर कोरले 'कॅप्टन कूल' धोनीचे चित्र; टॅलेंट पाहून थक्क व्हाल... VIDEO

Ms Dhoni portrait On WaterMelon Video: व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून त्याच्या या कलेचे कौतुक केले आहे.

Gangappa Pujari

MS Dhoni Viral Video:

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा क्रिकेट विश्वातील एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याचे नाव घेतले जाते. शांत व संयमी कर्णधार म्हणून धोनीची क्रिकेटच्या मैदानावर खास ओळख होती. क्रिकेट विश्वापासून सध्या धोनी लांब असला तरी त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर धोनीच्या फोटोंची, गाड्यांची आणि लांब केसांच्या हटके स्टाईलची नेहमी चर्चा होत असते. सध्या एका चाहत्याने आपल्या माहीसाठी सादर केलेल्या खास कलेची जोरदार चर्चा होत आहे.

महेंद्रसिंग धोनी म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध चेहरा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण धोनीचे चाहते आहेत. धोनीसाठी त्याचे चाहते नेहमीच नवनव्या कला दाखवून आपले प्रेम व्यक्त करत असतात. कधी लाडक्या माहीसाठी खास भलेमोठे होर्डिंग लावून तर कधी धोनीच्या नावाचा टॅटू अंगावर काढून धोनीचे चाहते आपले प्रेम दाखवत असतात.

सध्या धोनीच्या एका चाहत्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या  चाहत्याने महेंद्रसिंग धोनीचे अगदीच भन्नाट चित्र एका फळात कोरलं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून त्याच्या या कलेचे कौतुक केले आहे.

अंकित बगियाल असे या शेफचे नाव आहे. व्हिडिओमधील तरुण सगळ्यात पहिल्यांदा एका स्टँडवर कलिंगड ठेवतो आणि त्याला फायनल टचअप करताना दिसत आहे. तो कलिंगडावर खेळाडूचा चेहरा कोरण्यासाठी कलिंगडावरील काही भाग काढून घेताना दिसत आहे. अशाप्रकारे शेफ तो शेफ महेंद्रसिंग धोनीचे खास चित्र कलिंगडावर रेखाटून घेतो.

दरम्यान, अंकित बगियाल हा एक कलाकार असून याआधीही त्याने अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, टीम इंडियाच्या खेळाडूंचे चित्रे फळांवर रेखाटून आपली कला सादर केली आहे. सध्या कॅप्टन कूलचे त्याचे कलिंगडावर रेखाटलेले हे चित्र नेटकऱ्यांना चांगलेच आवडले आहे. या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्याच्या कलेचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT