Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

बापरे! दारूड्याचा भलताच प्रताप, थेट रेल्वेगाडी थांबली; रेल्वे ट्रॅकवर नेमकं घडलं काय?

Drunk Man On Track: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये एक दारुडा व्यक्ती थेट नशेत धावत्या ट्रेनच्या समोर आला आहे. पुढे जे घडतं ते एकदा व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

loco pilot beats man: दारू पिऊन रेल्वे रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीमुळे रेल्वेगाडी थांबवावी लागल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सिंदेवाही मार्गावरील राजोली क्रॉसिंगवर हा सगळा प्रकार घडला आहे.

एक दारुडा रेल्वे रुळावर लोळत होता. त्याचवेळी या मार्गावरून एक मालगाडी येणार असल्याने दोन्ही बाजूने फाटक बंद करण्यात आले. वाहनांच्या रांगा लागल्या आणि रेल्वे रुळावर या दारुड्याचा धिंगाणा सुरू होता. त्याच्या जीवाची पर्वा करता गेटमनने रेल्वे चालकाला निरोप पोहोचता केला.

त्यामुळे ही रेल्वे अगदी त्याच्या जवळ येऊन थांबली आणि त्याचा जीव वाचला. मात्र, संतापलेल्या पायलटने खाली उतरून या दारुड्याला चांगला चोप देत अद्दल घडवली. या मार्गावर सुपरफास्ट गाड्याही नियमित धावत असतात.

हा व्हिडिओ saamtv या युट्युब अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून अन्य जसे की, इन्स्टाग्राम,(Instagram) एक्स या अकाउंटवर अपलोड देखील करण्यात आलेला आहे. काहींनी हा प्रकार पाहिल्यानंतर गमंतशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT