CCTV footage shop theft controversy SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: महिलांनी शोरूममधून चोरले अंडरगारमेंट्स, CCTV मध्ये कैद झाली घटना

CCTV footage shop theft controversy: वाराणसीतील लहुराबीर परिसरातील दुकान चोरी प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वाराणसीमध्ये लहुराबीर परिसरात घडलेल्या एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. चेतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘अमाते स्टोर’ या अंडरगारमेंट्स दुकानातून सुमारे 10 हजार रुपयांचा माल चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुकानमालक सुदीप सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कशी झाली दुकानात चोरी?

एफआयआरनुसार, 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी तीन महिला दुकानात आल्या. त्यांनी सेल्स गर्लला बोलण्यात गुंतवून ठेवलं. याच दरम्यान एका महिलेने काही अंडरगारमेंट्स आपल्या बॅगमध्ये ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळाने तिन्ही महिला कोणताही माल खरेदी न करता दुकानातून निघून गेल्या. नंतर स्टॉक तपासला तेव्हा सुमारे 10 हजार रुपयांचा माल कमी झाल्याचं त्यांच्या. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर चोरी उघडकीस आली. या चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

या प्रकरणात वाराणसी महिला व्यापार मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सोनी यांचं नाव समोर आलंय. त्या पूर्वी नगर निगमच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरही कार्यरत असल्याची माहिती आहे. आरोपानुसार त्या आपल्या मुलगी आणि नणंद यांच्यासह दुकानात आल्या होत्या.

दरम्यान सुनीता सोनी यांनी आरोप फेटाळले असून त्यांनी सांगितलं की, त्या जौनपूरहून आलेल्या महिला नातेवाईकांसोबत दुकानात गेल्या होत्या. सोबत आलेल्या महिलांनी नेमकं काय केलं याची त्यांना माहिती नाही.

“चोरीचं प्रकरण समजताच मी दुकानदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चुकून काही वस्तू गेल्या असतील तर पैसे देण्याची तयारी आहे,” असं त्यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी केली कारवाई

चेतगंज थाना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओतील तपशील, जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरलाय. काही युजर्सनी कठोर कारवाईची मागणी केलीये तर काहींनी तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष न काढण्याचं आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT