Bath On Bike Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bath On Bike Case Filed: धावत्या दुचाकीवरची ठंडा ठंडा कूल कूल अंघोळ पडली महागात; Video व्हायरल, गुन्हा दाखल

Boy and Girl Bath On Bike Viral Video:दुचाकीवर अंघोळ करणाऱ्या तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar Viral Video: सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये उकाडा फार वाढला आहे. अशात या उन्हापासून वाचण्यासाठी उल्हासनगरच्या एका तरुणाने देसी जुगाड शोधला. हा जुगाड या तरुणाला चांगलाच भोवला आहे. दुचाकीवर अंघोळ करणाऱ्या तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bath On Bike)

या बाबत अधिक माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी एक तरुण आणि तरुणी दुचाकीवर बसून अंघोळ करत होते. गर्मीपासून थोडा थंडावा मिळावा म्हणून त्यांनी असं केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरिकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कहींना हा देसी जुगाड फार आवडला तर काही व्यक्तींनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

अशात व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक माध्यमांवर याचे वृत्त देखील आले. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या तरुणाचा आणि तरुणीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच कलम २७९ आणि मोटार वाहन कायदा १२९ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श शुक्ला असे या तरुणाचे नाव आहे.

आदर्शचा या आधी देखील आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने चक्क दुचाकीवर एक बर्फाची लादी ठेवली होती. तसेच त्या लादीवर बसून तो दुचाकी चालवत होता. सध्या सर्वत्र उकाडा फार वाढला आहे. यापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काही ना काही उपाय करत आहेत. अशा देसी जुगाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगे आणि सुरेश धस हत्येच्या कटानंतर करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर स्फोटक आरोप|VIDEO

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Baal Aadhaar Card: नवजात बालकांचं आधार कार्ड कसं काढायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस वाचा

Mobile Recharge Hike: मोबाईल रिचार्ज होणार महागणार; Jio-Airtel-Vi चा ग्राहकांना दणका

Maharashtra Politics: स्थानिक नेत्यांनी माझा घात केला, भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा; ढसाढसा रडत म्हणाले...

SCROLL FOR NEXT