Carver Vehicle  Saam TV
व्हायरल न्यूज

Carver Vehicle in Mumbai : मुंबईच्या रस्त्यावर धावली भन्नाट कार, लोक एकटक बघतच बसले; पाहा VIDEO

Carver Vehicle Viral Video : रिक्षाप्रमाणे या कारला तीन चाकं होती, मात्र ती रिक्षा नव्हता. ही कार ट्रॅफिक सिग्नलवर थांबली त्यावेळी तिच्या डिझाईनमुळे सर्वांच्या नजरा या कारवर स्थिरावल्या.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतील रस्त्यांवर अनेकदा विन्टेज कार धावताना दिसतात. अशी विन्टेज वाहने लोकांसाठी आकर्षण ठरतात. अशीच एक कार मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसली, मात्र ती विन्टेज कार नव्हती. वरळी परिसरात अशी एक भन्नाट कार लोकांनी पाहिली. या कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिक्षाप्रमाणे या कारला तीन चाकं होती, मात्र ती रिक्षा नव्हता. ही कार ट्रॅफिक सिग्नलवर थांबली त्यावेळी तिच्या डिझाईनमुळे सर्वांच्या नजरा या कारवर स्थिरावल्या. ही कार कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली. (Viral News In Marathi)

बर्‍याच लोकांनी या कारचा व्हिडीओ शूट केला आहे. अनेक व्हिडीओ ऑनलाइन शेअर केले जात आहेत. युनिक डिझाईन आणि तीन चाकी ही कार सध्या चर्चेत आली आहे. अनेकजण या कारची माहिती आता ऑनलाईन शोधत आहेत. (Latest Viral News In Marathi)

CarverElectricच्या वेबसाईटवर चेक केलं असता, कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार नाही किंवा स्कूटरही नाही. कंपनीने याला कर्व्हर म्हटलं आहे. हे १०० टक्के इलेक्ट्रिक वाहन आहे. जवळच्या प्रवासासाठी हे वाहन वापरता येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कर्व्हरची किंमत मॉडेलनुसार १० लाखांपासून १४ लाखांपर्यंत आहे. या वाहनाचा स्पीड ५० किमी प्रति तासपर्यंत आहे. हे वाहन एका चार्जिंगमध्ये १३० किमीपर्यंत धावते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT