BSF Jawan Singing Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

BSF Jawan Singing Viral Video : 'तु है तो मुझे फीर और क्या चाहिए'..., भारत- बांग्लादेश सीमेवर घुमला BSF जवानाचा आवाज, Video तुफान व्हायरल

BSF Jawan Singing Song On India Bangladesh Border : त्रिपुरातील उनोकोटी जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवरील कैला शहरातून एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. तिथे तैनात असलेला बीएसएफचा एक जवान, तु है तो मुझे क्या चाहिए, हे अरजित सिंग याने गायलेलं गाणं गाताना दिसत आहे.

Sandeep Gawade

BSF Soldier Singing Viral Video

दोन देशांच्या सीमा म्हटलं की नेहमीच काट्याच्या तारांचं कुंपण, बंदुकधारी दोन्ही देशांचे जवान, तणाव अशी सगळी परिस्थिती असते. सैन्यातील जवान स्वत:चं कुटुंब, गाव सोडून कित्येक महिने हजारो किलोमिटरवर दूर एखाद्या प्रदेशात सीमेवर तैनात असतात. दरम्यान त्रिपुरातील उनोकोटी जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवरील कैला शहरातून एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. तिथे तैनात असलेला बीएसएफचा एक जवान, तु है तो मुझे क्या चाहिए, हे अरजित सिंग याने गायलेलं गाणं गाताना दिसत आहे. पहाटे पहाटे मनाला भिडणारा या आवाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र यामधील काही व्हिडिओ असे असतात ज्यांना बघून आपण अश्चर्यचकित होतो. असाच एक व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगवर आहे. त्रिपुरामधील उनोकोटी जिल्ह्यात कैला हे शहर भारत-बांगलादेशच्या सिमेवर आहे. या सिमेवर बऱ्याचवेळा जवानांमध्ये भांडणं, हल्ले होतात. दोन देशांमधील सिमेवर नेहमीच तनावाचं वातावरण असतं. पण रविवारी सकाळी मनाला भिडणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बीएसएफचा एक जवान त्याच्या मघुर आवाजामध्ये मागच्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातलं सुप्रसिद्ध झालेलं गाणं 'तु है तो मुझे फिर और क्या चाहिये' हे गाणं गातांना दिसतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिथे असणाऱ्या स्थानिक लोकांनी हा व्हिडिओ काढला. त्या व्हिडिओमधील जवानाचं नाव पवन कुमार म्हणून असल्याचं कळतयं. माहितीनुसार, तो पंजाब पोलिसांसोबत काम करतो. तो त्याच्या सहकारी एस सोलंकी यांच्यासोबत हरियाणामध्ये गाताना दिसला. त्याच्या मधूर आवाजात 'दिव गलती कर बैठा है' आणि 'तु है तो मुझे फिर और क्या चाहिये' हे दोन्ही गाण्यांनी नोटकऱ्याचं लक्ष वेघून घेतलं आहे. तिथे स्थानिक असलेल्या सुमिधा दास त्यांच्या सोशल मिडीयावर लाईव्ह हा गाण्याचे व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.

''या बीएसएफ कर्मचाऱ्यांचा भव्य आवाज ऐका. कोणतेही ऑटोट्यून नाही. कोणतीही वाद्ये, मघूर आवाज," तिने फेसबुकवर व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. त्या व्हिडिओमुळे तिच्या अकाऊंटवर शेअर सोबत व्ह्यूज देखील आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT