Bride-Groom Marriage Funny Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bride-Groom Viral Video: भर मंडपात नवरदेवाचं नवरीसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Marriage Viral Video: डान्स करताना वधू इतकी उत्साही होते, की तिला आपण किती वेळा फेऱ्या मारल्या हे कळतच नाही.

साम टिव्ही ब्युरो

Bride-Groom Marriage Funny Viral Video: लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. सोशल मीडियावर लग्नसराईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात.

आत्तापर्यंत लग्न (Marriage) समारंभातील हजारो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये वराने वधूसोबत असं काही केलं, ती थेट जमिनीवरच आपटली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरदेव (Groom) आणि नवरी वरमाला घातल्यानंतर घूमर घूमर या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. अचानक नाचताना वर वधूला गोल फिरवू लागतो. डान्स करताना वधू इतकी उत्साही होते, की तिला आपण किती वेळा फेऱ्या मारल्या हे कळतच नाही.

त्यामुळे जास्त फिरल्यामुळे तिला चक्कर येते आणि डान्स करत असतानाच ती जमिनीवर पडते. आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा डान्स करताना नवरीचा (Bride) तोल जातो आणि ती खाली पडण्याच्या मार्गावर असते, तेव्हा नवरदेव तिला पकडण्याचा प्रयत्नही करत नाही.

दरम्यान, नवरी खाली पडल्यानंतर एक महिला त्याठिकाणी येते आणि नवरीला उचलू लागते. नवरदेवाच्या या धक्कादायक कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून काहींनी संताप व्यक्त केला असून काहीजण मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT