Brave Boy Rescues Goat saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाठीला दोरी बांधली, मुलाला ४० फूट विहिरीत उतरवलं; बकरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी चिमुकल्याचा खटाटोप

Brave Boy Rescues Goat: बिहारमध्ये खोल विहिरीत पडलेल्या बकरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका मुलाने जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मुलाचं सर्वत्र कौतुक होताना आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा या व्हिडीओमध्ये मजेशीर घटना किंवा एखादा गंभीर अपघात असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये बिहारमधील मोतीहरी जिल्ह्यातील पहारपूर परिसरात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना आहे.

खोल विहिरीत पडलेल्या एका बकरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी गावातील एका मुलाने स्वतःचा जीव धोक्यात घालत केलेल्या धाडसी प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या छोट्या मुलाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

विहिरीत पडलं होतं बकरीचं पिल्लू

मिळालेल्या माहितीनुसार, एका उघड्या विहिरीजवळ खेळत असताना बकरीचं पिल्लु अचानक तोल जाऊन आत पडलं. विहिरीतून त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी त्या ठिकाणी आले. मात्र विहीर खूप खोल असल्याने पिल्लापर्यंत पोहोचणं अवघड होतं.

यावेळी गावकऱ्यांनी शक्कल लढवली आणि पिल्लाला बाहेर काढलं आहे. गावकऱ्यांनी सुरुवातीला दोरखंड आणि इतर गोष्टींच्या मदतीने बकरीच्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विहिर खोली आणि अरुंद असल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

अशा परिस्थितीत गावातील एका छोट्या मुलाने स्वतः खाली उतरून पिल्लाला वाचवण्याची तयारी दाखवली. गावकऱ्यांनी त्याच्या कंबरेला मजबूत दोरी बांधली. काही पुरुषांनी वरून दोर घट्ट पकडून त्याला विहिरीत उतरवलं. विहीरीत उतरून तळाशी पोहोचल्यानंतर त्या मुलाने पिल्लाला घट्ट पकडलं आणि हळूहळू वर ओढलं. अशा रितीने त्या पिल्लाला वाचवण्यात आलं.

सोशल मीडियावर विविध कमेंट्स

या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये कोणी त्याच्या धाडलाचं कौतुक केलं आहे. तर कोणी त्याला खूप आशिर्वाद दिलेत. अजून एका युजरने, 'अशी माणुसकी आणि धैर्य आजही जिवंत आहे, हे पाहून आनंद वाटतो', असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

कैसे बोगस प्रमाणपत्र बनाया..., सहर शेख यांचं नगरसेवकपद जाणार? बोगस प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

SCROLL FOR NEXT