Archery by Boy Saam TV
व्हायरल न्यूज

Archery by Boy: मन जिंकलंस पोरा! पायात धनुष्यबाण धरत साधला अचूक निशाणा; लहान मुलाचा VIDEO VIRAL

Archery Viral Video: व्हिडीओमध्ये लहान मुलगा धनुर्विद्या शिकत आहे. त्याची धनुर्विद्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Ruchika Jadhav

Boy Archery Video Viral:

लहान मुलं नेहमीच काही ना काही अतरंगी कारणामे करत असतात. त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना योग्य शिकवन दिल्यास मुलं आपल्या देशाचं नाव उज्वल करतात. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलगा धनुर्विद्या शिकत आहे. त्याची धनुर्विद्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Latest Viral Video)

धनुष्यबाण चालवणं सर्वच तरुणांसाठी सोपं काम नाही. धनुष्यबाण चालवताना तुम्हाला तुमचं संपूर्ण लक्ष एकाच ठिकाणी केंद्रीत करावं लागतं. हातांचा योग्या बॅलेन्स ठेवत बाण मारावा लगतो. मोठी साधना आणि सराव करुन व्यक्ती धनुष्यबाण चालवणे शिकतात. हाताने धनुष्यबाण चालवताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल मात्र या चिमुकल्याने चक्क पायावर धनुष्यबाणाने नेम धरला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहन मुलगा आपल्या दोन्ही हातांवर आधी उभा राहतो. आपल्या उजव्या पायात धनुष्य पकडतो. दोन्ही हातांवर उभं राहिल्यावर उजवा पाय सरळ रेशेत घेऊन जातो. त्यानंतर डाव्या पायाने धनुष्यातील बाण निशाण्यावर लावतो. समोर असलेल्या फुग्याला हा लहान मुलगा अगदी सहज बाण मारतो.

त्याच्या या हुषारीचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. @rudrapratapsingh या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला १ लाखांहूनअधिक लाईक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT