Birthday viral video Saam TV
व्हायरल न्यूज

Birthday viral video: जीवघेणी मस्करी! वाढदिवसाचा केक कापताना तरुणाच्या डोळ्यात घुसला चाकू; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Knife Injury Eye: बडे पार्टी सुरू असताना एका मुलीसोबत तिच्या मित्रांनी असं करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मस्करी एका तरुणाच्या डोळ्याला मोठी इजा झाली.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर नेहमीच विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे असतात ज्याने खळखळून हसू येतं. तर काही व्हिडिओ अंगावर शहारे आणणारे असतात. अशात सोशल मीडियावर एका बर्थडे पार्टीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

वाढदिवस (Birthday) म्हटल्यावर सर्व मित्र मैत्रिणी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल तर केक कापताना त्या व्यक्तीचा चेहरा केकमध्ये आपटायचा असं ट्रेण्ड सुरू आहे. अशी एक बर्थडे पार्टी सुरू असताना एका मुलीसोबत तिच्या मित्रांनी मस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मस्करीत एका तरुणाच्या डोळ्याला मोठी इजा झाली.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, तरुणीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सर्वजण तेथे उपस्थित आहे. पार्टी सुरू असताना तरुणी केक कापण्यासाठी हातात मोठा चाकू पकडते. ती केक कापताना तिचे सर्व मित्र-मैत्रिणी तिच्या आवती भोवती गर्दी करतात आणि तिचं डोकं खाली केकमध्ये बुडवण्याचा प्रयत्न करतात. असे करताना तरुणी हातातला चाकू वरच्या दिशेने धरते आणि गप्प स्वतःचा चेहरा केकमध्ये बुडवते.

यावेळी तिने हातातला चाकू वरच्या दिशेने धरलेला असतो. त्यामुळे सर्व मित्रांपैकी एका मित्राच्या डोळ्याला हा चाकू लागतो. तो आपल्या डोळ्याला लागलं म्हणून ओरडू लागतो. त्यावेळी सर्वजण त्याच्या दिशेने धाव घेतात. मात्र नेमकं काय झालं हे कुणाच्याच लक्षात येत नाही. मस्करी करताना त्याची कधी कुसकरी होईल काही सांगता येत नाही.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. केक कापताना बीचाऱ्याचा डोळाच फोडला, अजून करा असे वाढदिवस. वेस्टर्न स्टाईल वाढदिवस चांगलाच महागात पडला, असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT