Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : बाईकवाल्याचा स्टंट लय भारी, व्हिडिओ पाहून म्हणाल, आरारारारा खतरनाक!

Bike Stunt Video : व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईक हायवेला वेगात धावत आहे. त्यावर दुचाकी चालवणारा व्यक्तीच नाहीये. पण मागच्या सीटवर एक व्यक्ती एका बाजून पाय ठेवून बसला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video :

सोशल मीडियावर आजवर अनेक बाईक स्टंटच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत. बाईक स्टंटचे असे आजवर अनेक खतरनाक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अशात सोशल मीडियावर सध्या काळजाचा थरकाप उडवणारा एक खतरनाक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल.

दुचाकी चालवताना वाहन चालकाला संपूर्ण लक्ष दुचाकी चालवण्याकडे द्यावं लागतं. जराजरी दुर्लक्ष झालं तरी मोठा अनर्थ घडतो. दुलर्क्ष किंवा शुल्लक चुकांमुळे आजवर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात बऱ्याच व्यक्तींनी आपला जीवही गमावला आहे. अशात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओपाहून यात अपघात घडण्याची शक्यता मोठी शक्यता दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईक हायवेला वेगात धावत आहे. त्यावर दुचाकी चालवणारा व्यक्तीच नाहीये. पण मागच्या सीटवर एक व्यक्ती एका बाजून पाय ठेवून बसला आहे. आता दुचाकी चालवताना तर कोणीही दिसत नाहीये. मात्र तरीही यावर मागे बसलेला हा व्यक्ती अगदी बिंधास्त आणि हासत खेळत यावर बसला आहे. पडण्याची आणि भीषण अपघात होण्याची जराही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये.

दुचाकीच्या शेजारून जाणाऱ्या इतर वाहनातील व्यक्ती देखील हे दृष्य पाहून चकित झाल्यात. गाडी कोण चालवत आहे? असा प्रश्न एका व्यक्तीने विचारला आहे. ही कोणती जादू आहे? गाडी कोण चालवतंय? नेमकं काय सुरू आहे? असे प्रश्न एक व्यक्ती दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीला विचारत आहे. त्यावर ही गाडी रामभरोसे चालली आहे, असं उत्तर या व्यक्तीने दिलं आहे.

दुचाकीवर बसल्यावर पकडण्यासाठी काहीच आधार नसेल तर भल्या भल्यांचा अपघात होतो आणि निट बॅलेन्स करता येत नाही. मात्र या व्यक्तीने केलेल्या स्टंट मागचं रहस्य नेमकं काय आहे हे अद्याप समजलेलं नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्यात सर्व काही राम भरोसे, दुचाकी यमराज चालवत आहे वाटतं, अशा मजेशीर कमेंट यावर आल्यात. @binodojha999 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT