Delhi Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Viral Video: एका हातात कोयता अन् दुसऱ्या हातात दारुची बाटली, धावत्या बाईकवर तरुणांची मस्ती; धक्कादायक VIDEO

Delhi Viral Video: हा संपूर्ण थरार पाठीमागे असलेल्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या संपूर्ण घटनेवरुन दिल्लीमधील गुन्हेगारी कोणत्या थराला गेली हेच दिसून येते.

Gangappa Pujari

Delhi Viral Video:

राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. दिल्लीमध्ये खून, मारामाऱ्या असले प्रकार सर्रास घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गुंडांना पोलिसांची भिती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तीन दुचाकीस्वार हातात चाकू घेऊन दिल्लीच्या (Delhi) रस्त्यावर बेधडकपणे फिरताना दिसत आहेत. या दुचाकीस्वारांनी एका हातात चाकू आणि दुसऱ्या हातात दारूची बॉटल धरल्याचे दिसत आहेत. एवढेच नाही तर हे तरुण एकत्र येऊन गोंधळही घालताना दिसत आहेत.

वर्दळीच्या रस्त्यावर, वाहनांची गर्दी असतानाही या तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे. गाडीवरील एक तरुण दुचाकीवर उभे राहत आहे तर दुसरा तरुण हातातील कोयता दाखवताना दिसत आहे. हा संपूर्ण थरार पाठीमागे असलेल्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेवरुन दिल्लीमधील गुन्हेगारी कोणत्या थराला गेली हेच दिसून येते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

@prerna82349124 नावाच्या एक्स अकांउटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोबतच "तीन मुले दिल्लीच्या रस्त्यांवर बेधडकपणे फिरत आहेत. हातात बाटल्या आणि चाकू फिरवत आहेत, असा कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या तरुणांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

SCROLL FOR NEXT