Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वर्गात विद्यार्थ्यांचे कडाक्याचे भांडण, शिक्षक मधेच आले आणि मग जे घडले ते पाहून तुम्ही थक्क व्हाल

College students Video: सोशल मीडियावर दररोज काहीना काही अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. त्यातच पुन्हा एकदा काही विद्यार्थ्यांचा हटके अंदाजाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की काय त्यात ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Farewell Video: प्रत्येक विद्यार्थी जीवनात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकदा निरोप समारंभाचे आयोजन केले जाते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कॉलेजच्या शेवटच्या दिवशीचा आहे. जिथे विद्यार्थ्यींनी त्यांच्या आवडत्या शिक्षकाला सरप्राईज देण्यासाठी भन्नाट प्रॅंक केले आहे. जो व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रँकचा मजेशीर ट्विस्ट

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत, एक शिक्षक वर्गाच्या दिशेने जोरदार पळत असताना दिसत आहे. दरम्यान शिक्षक वर्गात जाताच काही विद्यार्थी वर्गात मारामारी करत असतात. शिक्षक वर्गात येताच विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शांत करत असतात तेवढ्यात एक विद्यार्थ्यांनी केक घेऊन त्या शिक्षकाकडे येते आणि सर्व विद्यार्थी जोरजोरात टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतात. तेव्हा शिक्षकाला समजते के विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत प्रेमाने प्रॅंक केला आहे, कारण विद्यार्थ्यांचा त्या कॉलेजमधील शेवटचा दिवस होता आणि ते त्यांच्या वर्ग शिक्षक होते.

व्हायरल व्हिडिओ monsoon.dey या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होऊन ४ दिवस झाले त्यात लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''कॉलेजचा शेवटचा दिवस'' असे लिहिले आहे शिवाय अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आम्ही पण असंच केलं होतं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खतरनाक आहेत विद्यार्थी'' तर अन्य लोकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलेले आहेत.

टीप: विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT