Valmik Karad beaten lawyers and public outside court viral video  Saam Tv News
व्हायरल न्यूज

Walmik Karad : वाल्मिक कराडला चोपला? कोर्टाबाहेर वकील आणि जनतेकडून धुलाई? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

Walmik Karad Beaten Outside Court : निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा केलाय. मात्र, खरंच हा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का?

संदीप चव्हाण

बीड : वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. सुनावणीसाठी त्याला बाहेर आणलं जातं. त्यावेळीच कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, खरंच कराडला मारहाण झाली का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. गेल्या ३ महिन्यांपासून सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय, आणि या कराडला वकील आणि जनतेनं कोर्टाबाहेर चोप दिल्याचा दावा करण्यात आलाय. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा केलाय. मात्र, खरंच हा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का? असे अनेक सवाल उपस्थित केले जातायत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज काय?

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर चोप दिला. वकील आणि लोकांनी कराडला मारहाण केली.

हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. खरंच वाल्मिकला मारहाण झाली का? याची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. सर्व प्रथम व्हिडिओतील पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नसल्याचं स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही हे तपासात समोर आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

वाल्मिक कराडला मारहाण झालेली नाही

व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कराड नाही

व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असल्याची माहिती

वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय

सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजतंय. त्यामुळे अनेक असे व्हिडिओ व्हायरल केले जातायत. बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्याने आता हा व्हिडिओही लोकांना खरा वाटू लागलाय. मात्र, आमच्या पडताळणीत वाल्मिक कराडला चोप दिला हा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT