Bangle Selling Women Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: व्वा क्या बात है! बांगड्या विकणाऱ्या महिलेनं फाडफाड इंग्रजी झाडलं; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क

Bangle Selling Women Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही महिला असं काही फाडफाड इंग्रजी बोलते जे ऐकून नेटकरीही थक्क झालेत.

Gangappa Pujari

Bangle Selling Women Viral Video:

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. पण ज्याला इंग्रजी भाषा येते तो उच्चशिक्षित समजला जातो. इंग्रजी भाषा बोलायला शिकणे म्हणजे अनेकांसाठी महाकठीण काम. शाळा, कॉलेज करुनही अनेकांना आजही इंग्रजी बोलताना, वाचताना अडचण येते. मात्र सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही महिला असं काही फाडफाड इंग्रजी बोलते जे ऐकून नेटकरीही थक्क झालेत.

भारतात इंग्रजी बोलणारे लोक फारच कमी आढळतात. विशेषतः ग्रामीण भागात इंग्रजी भाषेची जाण असणारे अभावानेच दिसून येतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही महिला फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झालेत.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गोव्यामधील बाघा बीचवरील असल्याचे सांगण्यात येत आहे. एक फॉरेनर पर्यटक महिलेशी संवाद साधत आहे. त्याच्या प्रश्नांना ती इंग्रजीमध्ये उत्तरे देताना दिसत आहे. यामध्ये ही महिला कोरोनाच्या महामारीनंतर झालेले बदलांचे अनुभव कथन करत आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक महिला बांगड्या, ब्रेसलेट, नेकलेस विक्रीसाठी घेऊन बसली आहे. याचदरम्यान ती एका पर्यटकाशी इंग्रजीमध्ये संवाद साधत आहे. अगदी न अडखळता, स्पष्ट उच्चारासहीत ही महिला इंग्रजी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आमच्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही, अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात, तर काही जणांनी इंग्रजी फक्त भाषा आहे, हे तिने सिद्ध केल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

SCROLL FOR NEXT