Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर मिरवणुकीत बैलाने ठोकली धूम, सगळीकडे उडाला गोंधळ अन् ग्रामस्थांची धावपळ, नेमकं काय घडलं?

Bail Pola Festival Video: लातूरच्या खरौरा गावात बैलपोळा मिरवणुकीत लक्षा बैल उधळल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. नंतर पुन्हा उत्साहात सण साजरा झाला.

Manasvi Choudhary

बैलपोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलपोळा या सणाला वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची पूजा केली जाते. अनेक भागात संपूर्ण गावातून बैलांची मिरवणूक देखील काढली जाते. अशातच सोशल मीडियावर बैलपोळा सणानिमित्त एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भर मिरवणुकीत बैलाने जे काही केलं आहे ते पाहून तुमचीही पायाखालची जमीन सरकेल.

लातूरच्या खरोरा गावात दरवर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील शेतकऱ्यांनी बैलांना सजवून संपूर्ण गावभर मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान गावातील एका शेतकऱ्याच्या बैलाने धुमाकूळ घातला आहे. तत्तापुरे शेतकऱ्यांचा लक्षा बैल अचानक उधळला आहे. यामुळे ग्रामस्थांची धावपळ झाली.

लक्षा बैल भर मिरवणुकीत उधळून सर्वत्र उड्या मारत राहिला आणि तो इकडून तिकडे पळत राहिला. यामुळे सर्वच ग्रामस्थ घाबरले होते. मात्र काहीवेळाने बैल स्वत:च बैल शांत झाला आणि शेतात दावणीला जाऊन थांबला. मात्र यादरम्यान कुठलीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा बैलपोळा सण साजरा करण्यास सुरूवात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recherge Offer: युजर्ससाठी खास ऑफर! Jio चा व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन, मिळतील अनेक फायदे

Dhananjay Munde: मी बंजारा समाजासोबत, हा माझा व्यक्तीगत लढा – धनंजय मुंडे|VIDEO

Best Camera Phone : फोटोग्राफी प्रेमींसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: 'याची गर्लफ्रेंड त्याची बायको...'; वरुण- जान्हवीच्या लव्हस्टोरीमध्ये कॉमेडीचा तडका

प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT