Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: “बाया भुकल्यान गो…”, मराठी गाण्यावर तरुणींचा ठसकेबाज ठुमका; व्हिडिओ पाहून नेटकरी फिदा

Dance Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींचा एक व्हिडिओ प्रत्येकाच्या पसंतील आलेला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणींचा धम्माकेदार डान्स केलेला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हीही एकदा नक्की पाहा.

Tanvi Pol

Girls dancing Video: सोशल मीडियावर नुकताच एक भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पारंपरिक मराठी लोकगीत 'बाया भुकल्यान गो' या गाण्यावर दोन तरुणींनी डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. अंगात भिनलेला मराठमोळा जोश आणि दमदार हावभाव, तालात थिरकणारे पाय या सर्वांचा परिपूर्ण संगम असलेला हा व्हिडिओ पाहून अनेक जण फिदा झाले आहेत.

पारंपरिक गाणं, आधुनिक सादरीकरण

बाया भुकल्यान गो हे गाणं गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आले आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे आवडते गाणे बनले आहे. काहींनी याला ग्रामीण पार्श्वभूमीचं लोकगीत म्हटलं आहे. अशा या गाण्यावर तरुणींनी पारंपरिक ढंगात आणि त्याा थोडासा मॉडर्न टच देत स्टायलिश डान्स (Dance) केला आहे. ज्यात त्यांचा पारंपरिक पेहराव आणि चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह लोकांच्या पसंतील आलेला आहे.

हा डान्स व्हिडिओ (Video) इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर सध्या धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत तो जवळपास लाखो लोकांनी पाहिला असून या अन्य सोशल माध्यमांवरही शेअर करण्यात येत आहे. त्यातील तो इन्स्टाग्रामवरील _dolly_0320 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

तरुणींचा डान्स पाहून नेटकरी वर्गातून तुफान प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''डान्स एकदम झकास! गाणं ऐकताच अंगात जोश संचारतो'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एकच नंबर'' अशा अनेक तरुणींचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

SCROLL FOR NEXT