सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे लोकांच्या पंसतीस येतात त्यामुळे ते व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडीचा विषय बनून जातात. तसंच व्हिडिओ पाहून व्हिडिओत असणारे पदार्थ असो वा स्टंट प्रत्यक्षातही करतात. अशातच सोशल मीडियावर सफरचंद इडलीच्या व्हिडिओची तूफान चर्चा रंगली आहे..होय सफरचंद इडलीचं,तुम्ही कधी खाल्ली आहे का..?('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, सुरूवातीस एक व्यक्ती सफरचंदाच्या फोडी कापून घेतो. त्यानंतर एका डब्यातील इडलीचे तयार केलेले पीठ बाउलमध्ये काढून घेतो. बाउलमध्ये टाकलेल्या इडलीच्या पीठात सफरचंदाच्या बारीक कापलेल्या फोडी टाकतो.
फोडी टाकल्यानंतर एकत्रित केलेल मिश्रण सफरचंदासारख्या इडलीच्या भांड्यात घालून घेऊन इडल्या शिजवून घेतल्या जातात. शेवटी एका डिशमध्ये काढून,त्यावर सफरचंदाची एक फोड आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सजवण्यात येते. तसंच इडसीसोबत चटणी ,सांबार खायल देण्यात येते.
व्हायरल व्हिडिओहा @thegreatindianfoodie या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवरील पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट करण्यात आलेल्या या पेजवर फूड संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. आपण आजपर्यंत अनेक फूडचे व्हिडिओ पाहिले आहेत, ज्यामध्ये बिस्किटपासून तयार केलेले बटाटे वडे तसंच संत्र्याच्या सरबतात चीज घालून पित असल्याचे व्हिडीओ आपण पाहले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला जातोय. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,सफरचंद इडली खाल्ली आहे का?!. सफरचंद इडलीचा व्हिडिओ काही नेटकऱ्यांना आवडलेला आहे तर काहीनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.