Andhra Pradesh  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादात आढळला मेलेला झुरळ; भाविकांमध्ये संतापाची लाट, VIDEO

Andhra Pradesh Temple Prasad Viral Video: आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम देवस्थानम मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये भाविकाने खळबळजनक दावा केला आहे.

Vishal Gangurde

रेस्टोरंट आणि हॉटेलमध्ये जेवणात मेलेले किडे आणि झुरळ आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पदार्थांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशी एक घटना आता आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. एका प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादात मेलेला झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. आंध प्रदेशमधील एका प्रसिद्ध मंदिरात प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या लाडूमध्ये झुरळ आढळला. या प्रकारानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आंध प्रदेशच्या श्रीशैलम देवस्थानम मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जातात. याच लाडूमध्ये मेलेला झुरळ आढळल्याची घटना घडली. सरसचंद्र नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये प्रसादामध्ये मेलेला झुरळ आढळला. या व्हिडिओतून हा प्रसाद श्रीशैलम देवस्थानम मंदिरातील असल्याचा दावा केला जात आहे. सरसचंद्र याने पोस्ट करत मंदिर प्रशासनाला तक्रार दिली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

भाविकाने तक्रारीत म्हटलं की, 'श्रीशैलम देवस्थानम मंदिरात गेलो होतो. मंदिरात दर्शन केल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू मिळाला. प्रसाद खाताना त्यात मेलेला झुरळ आढळला. या पत्रात भाविकाने मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावर सवाल उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचे भाविकाने आरोप केला आहे. या प्रकारानंतर मंदिर प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी, असं म्हटलं आहे.

दरम्यान, कार्यकारी अधिकारी श्रीनिवास राव यांनी भाविक सरसचंद्र याचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंदिरात प्रसाद तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. मंदिराच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली लाडू तयार केले जातात. त्यामुळे प्रसादामध्ये झुरळ आढळण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे भाविकांनी प्रसादाबाबत कोणतीही काळजी करण्याचं कारण नसल्याचे मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : सतत डोकं दुखतंय? असू शकतो हाय बीपीचा धोका, 'ही' ३ लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT