Flight Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Flight Pilot News: विमान हजारो फूट उंचीवर, अचानक पायलटची तब्येत बिघडली अन्... थरकाप उडवणारी घटना

Shivani Tichkule

America News: आजकाल विमानाशी संबंधित वेगवेगळ्या घटना सातत्याने समोर येत आहेत, ज्या अतिशय आश्चर्यकारक आहेत. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. या ठिकाणी आकाशात उडणाऱ्या विमानाचा अचानक पायलट आजारी पडला. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, शनिवारी (१५ जुलै) एका छोट्या विमानाच्या पायलटची अचानक तब्येत बिघडली. यानंतर विमानातील एका प्रवाशाने विमान उडवण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

मॅसॅच्युसेट्सच्या वेस्ट टिस्बरी येथील मार्था व्हाइनयार्ड विमानतळाजवळ शनिवारी दुपारी ही घटना घडली. येथील पोलिसांनी (Police) सांगितले की, विमानाच्या लँडिंगदरम्यान पायलटची प्रकृती बिघडली होती. अपघातादरम्यान विमानाने धावपट्टीच्या बाहेर लँडिंग केले. त्यामुळे विमानाचा डावा पंख अर्धा तुटला. अधिकाऱ्यांनी विमानातील कोणाचेही नाव सांगितले नाही. यानंतर पायलटला तातडीने बोस्टन रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले.

पायलट अचानक आजारी पडला

या घटनेत महिला प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तिला स्थानिक रुग्णालयातून सोडण्यात आले. पाइपर मेरिडियन विमानाने शनिवारी दुपारी न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर काउंटी येथून या विमानाने उडान घेतली होती. पायलट आणि प्रवासी दोघेही कनेक्टिकटचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्य पोलीस, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन या अपघाताची चौकशी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT