Viral Video Instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: 'आज की रात' गाण्यावर तरुणाचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांना घायाळ करणारा VIDEO होतोय व्हायरल

instragram viral video: एखादी मुलगी असा डान्स करु शकत नाही असा डान्स या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल सर्व सामान्यांनपासून ते उच्च वर्गीयांपर्यंत सगळेच सोशल मीडीयाचा वापर करतात. आपल्या पोस्टवर एकदा का लाईक्स यायला सुरुवात झाली की, आपण व्हायरल व्हायला तयार होतो. तसाच एक डान्सचा दिवाना सोशल मीडीयावर आता व्हायरल होत आहे. 'आज की रात' गाण्यावर या मुलाने नेटकऱ्यांना घायळ केले आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडीयावर त्याचे चाहते तयार झाले आहेत. एखादी मुलगी असा डान्स करु शकत नाही असा डान्स या मुलाने केला आहे.

लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या व्हिडीओवर लोक जास्तीत कमेंट्स शेअर करत आहेत. व्हिडीओमध्ये हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल हा व्हिडीओ एका 'क्लब' मधला आहे. क्लब म्हटलं तर तिथे तरुण मुलं-मुली नवीन गाणी लावून डान्स इंजॉय करतात. तसचं तिथे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'स्त्रि २' या चित्रपटातले गाणे लावले होते. या गाण्यावर हा तरुन थिरकला. तो डान्स करताना अप्रतिम स्टेप्स करताना व्हिडीओत दिसला. त्यात गाण्याच्या लिरिक्स प्रमाणे तो कडक हावभावात लोकांचे लक्षवेधूवन घेत होता.

या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडीया प्लॅटफॉर्म व्हायरल झाला. इंस्टाग्रामवर त्याचे युजरनेम @grajender_Gajju आहे. याच अकाऊंटवर डान्सचा व्हिडीओ त्याने अपलोड केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये भरभरु प्रतिसाद दिला. एका प्रतिक्रियेत त्याचा फॅन म्हणाला , 'तू तमन्ना भाटीयाला मागे टाकलसं' असे लिहीले होते. या प्रसिद्धीमुळे आता त्याचे दहा हजार(१ मिलीयन) फॉलोवर्स आहेत. तो आधीपासून बरेच डान्सचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत होता.

सध्या डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच या तरूणाचा 'आज की रात' गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या इतक्या वर्षींच्या मेहनतीला या व्हिडोओमुळे यश मिळाले असे म्हणायला हरकत नाही.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT