Bar Dancer Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ramleela Dance Video: 'कलयुग की रामलीला', रावणाच्या दरबारामध्ये महिलांचा अश्लिल डान्स; 'आज की रात..' गाण्यावर ठुमके, पाहा VIDEO

Bar Dancer Viral Video: उत्साहाच्या भरात कलाकारांनी हद्द पार केली. रावणाच्या समोर बॉलिवूड गाण्यावर बार डान्सर नाचवल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने संताप व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्री सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. काल दसरा निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतु एका ठिकाणी उत्साहाच्या भरात कलाकारांनी हद्द पार केली. रावणाच्या समोर बॉलिवूड गाण्यावर बार डान्सर नाचवल्या आहेत.

दसऱ्यानिमित्त अनेक ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात येते. रामलीला मध्ये भगवाना रामाचे चरित्र त्यांचे संवाद आणि रामायणाशी संबंधित इतर पात्रे यांचे सादरीकरण असते. एकूणच हा धार्मिक कार्यक्रम असतो. मात्र आजच्या कलियुगात रावणासमोर महिलांचा अश्लील डान्स सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रावणाच्या समोर नर्तक नाचत आहेत. रावणाच्या मांडीवर बसून नर्तिकेचा डान्स सुरू आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर देखील या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून राग व्यक्त केला जात आहे. रामलीली आणि अश्लीलतेचे प्रकरण सुरू आहे.

अहमदाबादमधील रामलीला कार्यक्रमात हा प्रकार समोर आला आहे. रामलीलाच्या या कार्यक्रमात भजन आणि कीर्तनांऐवजी अश्लीलतेची सेवा केली जात होती. रामलीलाच्या स्टेजवर 'आज की रात हुस्न का माझा' या गाण्यावर नर्तक नाचत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT