Teacher Fight Video Saam TV
व्हायरल न्यूज

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Teacher Fight Video Viral: सध्या शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि मुख्यध्यापक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

सध्या शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेत शिक्षक आणि मुख्यध्यापक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं दिसत आहे. ही घटना आग्र्यामधील एका शाळेमधील असल्याची माहिती मिळत (Teacher Fight Video Viral) आहे. महिला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात शाळेत उशिरा येण्यावरून वाद झाल्याचं दिसत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिग्ना पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापक संतापले. अन् त्यांनी शिक्षिकेला मारहाण केली (Teacher Fight Video) आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. या भांडणाच्या वेळी तिथे लहान मुलं देखील उपस्थित असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे (viral video) आता शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा विद्येचं माहेरघर आहे, तिथेच असभ्य वर्तन पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात फिरत असल्याचं दिसतंय.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी भांडताना एकमेकांचे कपडे ओढले आहेत. त्यामुळे त्यांचे कपडे देखील फाटले आहेत. या हाणामारीत मुख्याध्यापिकेच्या चालकाचाही हात असल्याचा आरोप होत (viral news) आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. सोशल मीडियावर लोकं आता या शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दोघींवर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT