Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : एका विडीमुळं दुकानं, वाहनं पेटली, धक्कादायक घटनेचा CCTV व्हिडिओ

Shocking Video : सोशल मीडियावर सध्या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक छोट्या चुकीमुळे संपूर्ण दुकानाला आग लागलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेक अपघात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे घडलेले आहेत. व्यक्तीचा निष्काळजीपणा त्याच्यासाठी धाकोदायक आणि घातक ठरतो.सध्या याच गोष्टीता प्रत्यय आंध्र प्रदेश राज्यातील एका शहरात आलाय. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आपल्याला अनेक थरारक(Thrilling) अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहायला मिळतात. त्यात कधी अनेक व्यक्तीना जीव गमवावे लागतात तर अनेकदा वित्तहानी होताना दिसते.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेमध्ये व्यक्तीची एक छोटी चूक किती मोठी हानी निर्माण करु शकते,हे प्रत्येकाला समजून येईल.

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल(Viral) व्हिडिओत,दोन व्यक्ती काही बंद दुकानाच्या बाहेर उभे असलेले दिसून येत आहेत.त्यातील एक व्यक्ती काही वेळात विडी घेतो आणि विडी जळवण्यासाठी माचिसची काडी पेटवतो.मात्र ज्यानंतर तो विडी पेटवून माचिसची काडी खाली फेकून देतो. परंतू ज्या वेळेस माचिसची काडी खाली टाकतो तस काही क्षणात संपूर्ण दुकानाला आग लागते. सुदैवाने दुकानाबाहेर असलेले व्यक्ती तेथून पळ काढतात.

कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार,संपूर्ण धक्कादायक (Shocking)प्रकार आंध्र प्रेदशमधील अनंचपूर जिल्ह्यातील आहे. आग लागण्याचे कारण असं की, जे दोन व्यक्ती दुकानाबाहेर उभे होते. तिथे पेट्रोल पडले होते,त्याच कारणामुळे तेथे आग लागल्याचे समजते.

सध्या व्हायरल होत असलेला सीसीटीव्ही (CCTV)फुटेज व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @builder_majid या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे.सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा करण्यात येत आहे. व्हिडिओला लाखोंच्या घरात अजूनही व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

SCROLL FOR NEXT