Rajasthan Viral VIdeo Saamtv
व्हायरल न्यूज

Rajasthan Viral Video: बापरे, खतरनाक! लग्न मोडल्याने चिडलेल्या तरुणाचा प्रताप; तरुणीला भरदिवसा पळवलं अन् जंगलात नेवून...

Viral Video: मुलगी लग्नासाठी तयार नसताना नराधमाने तिला उचलून घेऊन फेरे घेत लग्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Jaisalmer Viral Video: सोशल मीडियावर एकापेक्षा एक भयानक व्हिडिओ सध्या पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा हे खरं आहे की चित्रपटाचा सीन आहे? हाच प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये एका तरुणीला घरातून पळवल्याचा व्हिडिओ समोर आला होता, जो पाहून नेटकरी थक्क झाले होते.

आता राजस्थानमध्येही असाच एक फिल्मी स्टाईल थरार समोर आला असून भरदिवसा मुलीला पळवून नेत लग्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओने सर्वांचीच झोप उडवली आहे, काय आहे हे प्रकरण जाणून घेवू.

राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जैसलमेरमध्ये एका तरुणाने तरुणीला जबरदस्तीने उचलून आपल्यासोबत नेले आणि जंगलात आग लावून सात फेरे घेतले आहेत. मुलगी लग्नासाठी तयार नसताना नराधमाने तिला उचलून घेऊन फेरे घेत लग्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार 1 जून रोजी सकाळी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 15 ते 20 जणांनी त्यांच्या मुलीचे घरासमोरून अपहरण केले. यानंतर आरोपीने मुलीसह तिला बळजबरीने निर्जनस्थळी नेले. फेऱ्या मारत असताना त्याने व्हिडिओही बनवला आणि घरच्यांना धमकावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Latest Marathi News)

हा व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच पिडीत तरुणीला तिच्या कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेतील उर्वरीत आरोपींनाही तात्काळ अटक करु असे आश्वासनही पोलिस प्रशासनाने दिले आहे. या फिल्मी स्टाईल अपहरणाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी गुन्हेगारांना प्रशासनाचा धाक राहिला नसल्याने असे प्रकार वाढत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT