Agra Accident Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: माणुसकी हरवली! रस्त्यावर तडफडुन व्यावयासिकाचा मृत्यू; लोकांनी मदतीऐवजी १ लाख रुपये पळवले| संतापजनक VIDEO

Agra Accident Viral Video: अपघातातील जखमी झालेल्या व्यावसायिकाला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरील लोकांनी त्याच्या जवळील तब्बल १ लाखांची रक्कम पळवून नेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Agra Accident Video News:

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे प्रत्येक सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र अलिकडच्या काळात अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्याऐवजी व्हिडिओ काढणे,रिल्स बनवने किंवा अपघातग्रस्त व्यक्तीचे साहित्य पळवणे अशा गोष्टी वाढताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका पिकअपचा अपघात झाल्यानंतर लोकांनी मदतीऐवजी गाडीमधील कोंबड्या पळवल्याची घटना घडली होती. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ९ जानेवारीच्या संध्याकाळी भीषण अपघात झाला. एका कंटेनर चालकाने दारूच्या नशेत महामार्गावरील पाच गाड्यांना चिरडले. या अपघातात एका व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील जखमी झालेल्या व्यावसायिकाला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरील लोकांनी त्याच्या जवळील तब्बल १ लाखांची रक्कम पळवून नेली.

या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. धर्मेंद्र असे या मृत खवा व्यापाऱ्याचे नाव आहे. अपघातावेळी धर्मेंद्र यांच्याकडे एक बॅग होती, त्यात एक लाख रुपये आणि काही कागदपत्रे असल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. या गर्दीतील एका तरुणाने एका व्यावसायिकाचे एक लाख रुपये चोरले.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया...

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पैशापुढे कोणाच्या जिवाचीही पर्वा या लोकांना नाही का? असा सवाल काही युजर्सनी विचारला आहे, तर काही नेटकऱ्यांनी या लोकांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT