Granfather Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Granfather Viral Video: गोल रिंगण, फुगड्या अन् विठुरायाचा जयघोष; ८२ व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी आजोबांची ऊर्जा; VIDEO VIRAL

82 year Old Grandfather Aashadhi Wari Viral video: आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आषाढी वारीला लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण जातात. आषाढी वारीला गेलेल्या ८२ वर्षीय आजोबांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक देवदेवता, संताच्या आशिर्वादाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. महाराष्ट्रात दरवर्षी वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनाला जातात. पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी संपू्ण पंढरपुर विठुरायाच्या नामघोषाने रंगून जाते. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक लोक वारीला जातात. वारीला जाताना कोणत्याही वयाचे बंधन नसतात. वारीत पायी चालताना लोक तहान-भूक विसरतात. फक्त विठुरायाचे नाव तोंडात असते. एका ८२ वर्षीय आजोबांचा वारीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या ८२ वर्षीय आजोबांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवेल असा आहे. या आजोबांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हे ८२ वर्षीय आजोबा आपले वय विसरुन टाळ, मृदृंगाच्या तालावर नाचताना दिसत आहे. वारकऱ्यांसोबत फुगड्या घालत वेगवेगळे खेळ खेळताना दिसत आहे. टाळ मृदृंगाच्या तालावर नाचणाऱ्या आजोबांचा व्हिडिओ खूपच मस्त आहे.आजोबांचा हा उत्साह पाहून तरुण मंडळी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत.

विठुरायाच्या वारीला जो व्यक्ती जातो तो खूप प्रसन्न असतो. वारीला सुरुवात झाली असून दररोज वारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात अनेक लहान मुलांचे, महिलांचे आणि वयोवृद्ध लोकांचे व्हिडिओ असतात. वारीला जाणारा प्रत्येक व्यक्ती विठुरायाचे नामस्मरण करत असतो. महिला डोक्यावर तुळशी, विठुरायाची मुर्ती घेऊन चालताना दिसतात.आजोबांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC महा एल्गार मेळाव्यापूर्वी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला पाठवली नोटीस

Maharashtra Live News Update: गोकुळ दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

Vasubaras 2025: वसुबारस म्हणजे काय? दिवाळीत का साजरी करतात?

Shocking: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, वर्गमित्रानेच केलं भयंकर कृत्य; कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर...

Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT