Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाहावं ते नवलचं! पठ्ठ्याने घरातील फॅनला असं काय केलं की VIDEO पाहून नेटकरीही म्हणाले...

Viral News: उन्हाळ्यात एसी आणि पंख्यांची मागणी वाढत असताना, अनोख्या हेलिकॉप्टर डिझाइनच्या पंख्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा पंखा पाहून लोक आश्चर्यचकित होत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Dhanshri Shintre

हिवाळा संपताच उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागतात, आणि एसी व पंख्यांची मागणी झपाट्याने वाढते. बाजारात सध्या हाय-टेक आणि आकर्षक डिझाइनचे सीलिंग फॅन उपलब्ध असून, त्यांचे अनोखे रूप पाहून लोक चकित होतात. अनेकदा असे वाटते, हा पंखा आहे की काहीतरी वेगळं? लोकांच्या हौसेमुळे बाजारात विविध रेंज आणि डिझाइनचे पंखे येऊ लागले आहेत.

यामध्ये सध्या ‘हेलिकॉप्टर फॅन’ नावाचा विशेष पंखा चर्चेत आहे. त्याचा अनोखा आणि हेलिकॉप्टरच्या ब्लेडसारखा डिझाइन लोकांचे लक्ष वेधून घेतो. आधुनिक आणि आकर्षक पंख्यांच्या या प्रकारांमुळे उन्हाळ्यातील उष्णता कमी करताना घराचे सौंदर्यही वाढवण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळतो. हेलिकॉप्टरच्या डिझाइनसारख्या अनोख्या सीलिंग फॅनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा पंखा पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत, कारण तो खरोखर सीलिंग फॅन आहे की हेलिकॉप्टरचा भाग, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

आकर्षक डिझाइनमुळे तो लोकांचे लक्ष वेधत असून, अशा अनोख्या पंख्यांची मागणीही वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइनच्या या मिश्रणाने पंख्यांना नवा आयाम दिला आहे. इन्स्टाग्राम हँडल '@amera_q8_2016' वर पोस्ट केलेल्या हेलिकॉप्टर डिझाइनच्या अनोख्या पंख्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 54 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

शेकडो लोकांनी या पंख्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “यालाच म्हणतात हेलिकॉप्टर फॅन!” दुसऱ्याने प्रश्न विचारला, “हे बनवलं तरी कुणी?” तर आणखी एका युजरने लिहिलं, “खूपच क्रिएटिव्ह आणि कूल डिझाइन आहे!” या पंख्याच्या अनोख्या डिझाइनने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT